pension खाजगी नोकरीतही मिळवू शकता तुम्ही पेन्शन, जाणून घ्या सरकारच्या या योजनेविषयी

मुंबई : तुम्ही खाजगी नोकरीत आहात पण मी जर तुम्हाला सांगितले की खाजगी नोकरीत असून सुद्धा तुम्हाला सरकारतर्फे सरकारी नोकरीतील कर्मचाऱ्यानप्रमाणे पेन्शन मिळू शकते आश्चर्य वाटले ना. पण हे शक्य आहे.ते सरकारच्या ‘अटल पेन्शन योजने ‘अंतर्गत .
तुम्ही या योजनेत काही मोजकी रक्कम गुंतवून पेन्शनधारक बनू शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महा २ हजार, ३ हजार, ५ हजार ,१० हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळू शकते. या योजनेमध्ये 18 ते 40 वर्षे वयाचे कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो .
जर आपल्याला कुटुंबासाठी म्हणजेच पती-पत्नी या दोघांना ही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण दरमहा ४२० रुपये एवढी रक्कम भरू शकता.
आपण जर दरमहा ४२० रुपयांपर्यंत रक्कम भरली तर आपणास वयाच्या ६० वर्ष नंतर प्रत्येकी दहा हजार महिन्यापर्यंत लाभ मिळू शकतो.
सरकार या योजने अंतर्गत आपल्यास काय परतावा देते
प्रत्येक महिन्याला 1 हजार रुपये मासिक पेन्शनसाठी 42 रुपये जमा करावे लागतील.
2 हजार रुपयांच्या पेन्शनसाठी 84 रुपये
3 हजार रुपयांसाठी 126 रुपये
4 हजार रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी 168 रुपये जमा करावे लागतील.
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आयकर कायदा दोन लाख रुपयांपर्यंत कर लाभ मिळतो. त्यामुळे ही योजना नागरिकांना नक्कीच लाभदायक ठरत आहे.



