उद्योग / व्यवसाय

गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता

Buisness Batmya

देशात सध्या इंधनामध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले असून देखील काही वस्तूंच्या विक्रित महागाई वाढलेलीच आहे. त्यात गॅस सिलिंडरच्या किंमती काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. काही दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या असल्याने त्या 900 ते 1000 पर्यत गेल्या आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला याचा मोठा फटका बसताना दिसत आहे.Possibility of large increase in gas cylinder rates

अशातच आता आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती वाढू लागल्या आहेत त्यामुळे देशातील गॅस सिलिंडरच्या किंमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस च्या किंमतींचा आढावा घेऊन त्या ठरविल्या जात असतात. यामुळे उद्या घरगुती, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Share Market: शेअर बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आजचे दमदार 10 शेअर्स

दरम्यान उद्यापासून बँका, पोस्ट आदींचे नियम बदलणार आहेत. त्यामुळे कमी किंमतीमध्ये गॅस सिलिंडर बुक करण्याचा आजचाच शेवटचा दिवस असणार. तसेच या महिन्यात दोनवेळा गॅसच्या दरात वाढ झाली होती. त्यात पहिल्या तारखेला ५० रुपयांनी गॅसचे दर वाढले होते. तर १९ मे रोजी कंपन्यांनी काही रुपयांनी दर वाढविल्याने ३.५० रुपयांनी सिलिंडरचे दर वाढले होते.

सध्या दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १००३ रुपये आहे.तर मुंबईत १००५ रुपये, कोलकातामध्ये १०२९ रुपये आहे. आणि तसेच केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी उज्ज्वला योजनेतून गॅस कनेक्शन घेतलेल्यांसाठी २०० रुपयांची सबसिडी जाहीर केली असल्यामुळे त्यांना हा सिलिंडर ८०० रुपयांना मिळणार आहे.

बाजारात बनावट नोटांचे थैमान….

 

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!