ऐन पेरणीच्या हंगामात खते महागण्याची शक्यता

business batmya
मुंबईः Fertilizers are likely to become more expensive during the sowing season रशिया हा खतांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल तसेच खनिजांचा एक मोठा निर्यातदार देश आहे. पश्चिमी देशांनी आमच्यावर निर्बंध घातले आहेत. अशा स्थितीमध्ये जर कच्चे तेल (oil) व ऊर्जा मिळवण्यासाठी वापरात येणाऱ्या इतर साधनांची किंमत वाढल्यास त्याचा दोष रशियाला देता येणार नाही. जगभरात रसायने आणि खतांचे (fertilisers) भाव वाढू शकतात, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. पुतीन यांनी एका भाषणात बोलताना म्हटले आहे . Fertilizers are likely to become more expensive during the sowing season
रशियाकडून निर्यात होणाऱ्या गॅस व कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय देखील अमेरिकेने घेतला आहे. असे केल्यास रशियाची आर्थिक रसद थांबवली जाईल आणि या पैशांचा वापर रशियाला युद्धात करता येणार नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.रशियाने युक्रेनविरोधात युद्ध (Russia Ukraine Crisis) सुरू केल्याने रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकेने रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत.
खतांचे भाव वाढणार
खतांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढतील. कारण रशिया आणि बेलारूस हे दोनही देश खते आणि इतर रसायनांचे सर्वात मोठे निर्यातदार देश आहेत. अशा स्थितीमध्ये जर रशियावर निर्बंध कायम राहिल्यास भविष्यात खते महाग होऊ शकतात असे रशियन प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांनी जर रशियावर निर्बंध कायम ठेवले तर त्याचा मोठा फटका हा जगाला बसणार आहे. Fertilizers are likely to become more expensive during the sowing season
भारतात खते महागण्याची शक्याता
दरवर्षी देशात पाच कोटी टन विविध प्रकारच्या खतांची निर्मिती करण्यात येते. रशिया खतांचा एक मोठा निर्यातदार देश आहे. रशियामध्ये सिंथेटिक फर्टिलायझर आणि युरियाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. भारतात देखील ऐन पेरणीच्या हंगामात खते महागण्याची शक्यता आहे. खते महाग झाल्यास त्याचा मोठा आर्थिक फटका हा शेतकरी वर्गाला बसू शकतो.खत निर्मितीमध्ये जगात रशियाचा तेरा टक्के वाटा आहे. अशा स्थितीमध्ये जर रशियावरील निर्बंध कायम राहिल्यास जगात खतांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.


