मोबाईल

Realme Narzo 50A Prime चा नवा स्मार्टफोन चार्जरशिवाय येणार भारतात, जाणून घ्या

buisness batmya

मुंबई : भारतात स्मार्टफोन निर्माता रियलमी लवकरच नवीन फोन रियलमी नार्झो 50ए प्राईम सादर करणार असून, हा नवा स्मार्टफोन चार्जरशिवाय विकला जाणार आहे. तसेच हा या कंपनीचा पहिला फोन असेल जो चार्जरशिवाय बाजारात दाखल झाला असल्याने अॅपलने चार्जरशिवाय फोन पाठवायला सुरुवात देखील केली आहे. कंपनीने तशी याबाबत अलीकडेच घोषणा केली आहे की आगामी स्मार्टफोन Realme Norzo 50A चार्जरशिवाय येणार आहे. गेल्या महिन्यात Realme Norzo 50A Prime हा फोन इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आला असून, तिथेही हा फोन वॉल चार्जरशिवाय पाठवण्यात आला होता. त्यामुळे Narzo 50A प्राइम चार्जिंग ब्रिकशिवाय शिप करण्यात आलेला पहिला Realme स्मार्टफोन असणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.Realme Narzo 50A Prime’s new smartphone will arrive in India without a charger, find out

कंपनीने म्हटले आहे की Realme Narzo 50A Prime चं भारतीय व्हर्जन बॉक्समध्ये वॉल चार्जरशिवाय डिलीव्हर केलं जाणार आहे. तसेच Realme Narzo 50A Prime च्या बॉक्समधून चार्जिंग ब्रिक काढून टाकल्याने कंपनीला अनेक प्रकारे मदत झाली असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या फोनचे असणारे डिव्हाइस सर्वोत्तम किंमतीसह, व अपग्रेडसह सादर केलं जाणार आहे.

आता काही खरे नाही आज पुन्हा वाढले पेट्रोल डिझेल…लिटरचा भाव झाला एवढा

Realme Narzo 50A Prime चे स्पेसिफिकेशन्स

गेल्या महिन्यात हा स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये Android 11-आधारित Realme UI R व्हर्जनसह लॉन्च करण्यात आला होता. तर Realme Narzo 50A प्राइम भारतात येत्या आठवड्यात लॉन्च होणार आहे. तसेच हा फोन 6.6-इंचाच्या फुल-एचडी+ डिस्प्लेसह येतो आणि Unisoc T612 चिपसेटसह सुसज्ज आहे. त्यामुळे या फोनमध्ये 4GB RAM आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे, याची स्टोरेज स्पेस microSD कार्ड स्लॉटद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. हा स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आणि 5,000mAh बॅटरीसह लॉन्च केला जाणार आहे.

तुम्हालाही ‘असा’ मेसेज आला असल्यास आणि तुम्ही क्लिक केल्यास तुमचा घातं झालाचं

या स्मार्टफोनचा कॅमेरा Realme Narzo 50A प्राइम ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी शूटर, एक मोनोक्रोम पोर्ट्रेट सेन्सर आणि मॅक्रो लेन्स समाविष्ट असेल. Realme Narzo 50A Prime मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेलचा शूटर असेल.

कॉर्पोरेट कंपन्यांकडून राजकीय पक्षांना 1 वर्षात 720 कोटींचा निधी

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!